अजिंक्यतारा सातारा या जिल्ह्यातील सातारा गावातीलच एक किल्ला आहे. अजिंक्यतार्याची उंची साधारणत: ४४०० फूट असून त्याचा दक्षिणोत्तर विस्तार ६०० मीटर आहे.
अजिंक्यतारा म्हणजे मराठ्यांची चौथी राजधानी. पहिली राजगड मग रायगड त्यानंतर जिंजी आणि चौथी अजिंक्यतारा. हा किल्ला शिलाहार वंशातल्या दुसर्या भोजराजाने इ.स. ११९० मध्ये बांधला. पुढे हा किल्ला बहामनी सत्तेकडे आणि मग विजापूरच्या आदिलशहाकडे गेला. २७ जुलै १६७३ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांच्या हाती आला. या किल्ल्यावर शिवरायांना अंगी ज्वर आल्याने दोन महिने विश्रांती घ्यावी लागली. औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर किल्ल्याचे नामकरण आझमतारा झाले .ताराराणीच्या सैन्याने पुन्हा किल्ला जिंकला व त्याचे नामातंर अजिंक्यतारा केले., पण पुन्हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला. मात्र १७०८ मध्ये शाहूने फितवून किल्ला घेतला आणि स्वतःस राज्याभिषेक करून घेतला. दुसर्या शाहूच्या निधनानंतर किल्ला ११ फेब्रुवारी १८१८ मध्ये इग्रजांकडे गेला.
काय पाहाल -
सातार्यातून ज्या मार्गाने आपण गडावर प्रवेश करतो त्यामार्गावर दोन दरवाजे आहेत. दरवाजाचे दोन्ही बुरूज आज अस्तित्वात आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर उजवीकडे हनुमानाचे मंदिर आहे. मात्र गडावर पाण्याची सोय नाही. डावीकडे सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर वाटेत महादेवाचे मंदिर लागते. समोर प्रसारभारती केंद्राचे कार्यालय व मागे प्रसारभारती केंद्राचे दोन टॉवर आहेत. ताराबाई यांचा निवास असलेला पण आता ढासळलेला राजवाडा आणि कोठार आहे. मंदिराकडे जाताना तीन तळी वाटेत लागतात. वाटेच्या शेवटी मंगळादेवीचे मदिर लागते. मंदिराच्या समोरच मंगळाईचा बुरूज आहे. मंदिराच्या आवारात अनेक शिल्पे आढळतात. गडाच्या उत्तरेलादेखील दोन दरवाजे आहेत. या दरवाजात येणारी वाट सातारा-कराड हमरस्त्यावरून येते. दरवाजापाशी पाण्याचे तीन तलाव आहेत. गडाला प्रदक्षिणा घालून आल्यामार्गाने खाली उतरावे लागते. किल्ल्यावरून समोरच यवतेश्वराचे पठार, चंदनवंदन किल्ले, कल्याणगड, जरंडा आणि सज्जनगड हा परिसर दिसतो.
संपूर्ण गड बघण्यासाठी साधारणतः दीड तास लागतो. गडावरून मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा शहराचे विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळते.
Subscribe my Youtube Chennel -
https://www.youtube.com/gpsflick
Route -
From Pune -
Pune -Shirval - Satara - Ajinkyatara Killa (118 KM)
From Mumbai -
Mumbai - Pune -Shirval - Satara - Ajinkyatara Killa (258 KM )
Follow me on Instagram
https://www.instagram.com/girishpatankar.official/
Like me on Facebook
https://www.facebook.com/gpsflick/
Follow me on Twitter
https://twitter.com/GPsFlick
My Equipment:-
Camera - One Plus 7 Mobile Phone
Microphone - Boya MM1
Tripod - Marklif Flexible Gorillapod
Music:
YouTube Audio Library,
Song: MBB - Bora Bora
Music provided by Vlog No Copyright Music.
Creative Commons - Attribution-ShareAlike 3.0 Unported
Video Link: https://youtu.be/53ZjQWNfBcI
Song: Sappheiros - Lights
Music provided by Vlog No Copyright Music.
Creative Commons - Attribution 3.0 Unported
Video Link: https://youtu.be/dfL3jM6Pt_4
Song: x50 - Miss U
Music provided by Vlog No Copyright Music.
Video Link: https://youtu.be/4lMXI0qnyrg